शपथविधीला हजर असलेल्या आमदाराची अजित पवारांच्या हकालपट्टीसाठी सही

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

शपथविधी सोहळ्यानंतर हे सर्व आमदार राजभवनाच्या बाहेर पडले. त्यापैकी काही आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत सर्व प्रकार सांगितला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शनिवारी (ता.23) सकाळी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि राज्यात राजकीय उलथापलथीला सुरवात झाली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी केली. त्यानंतर आता जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापुढे विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची निवड विधिमंडळ गटनेतेपदी करण्यात आली होती.

- 'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं'; 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य

No photo description available.

राजकारणात कोण कुणाचं नसतं याचा प्रत्यय यावा, असा काहीसा प्रकार शनिवारी दिवसभर घडला. सकाळपासून सुरू झालेल्या थरार नाट्याला पूर्णविराम कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या जनतेला मात्र एकावर एक धक्के मिळत आहेत.

महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जयंत पाटील यांच्या नियुक्ती पत्रकावर सिंदखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील सही केली आहे. आज सकाळी जेव्हा बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी आमदार डॉ. शिंगणे हे राजभवनात उपस्थित होते. अजित पवारांनीच शिंगणे यांना बोलावून घेतले होते. त्यानुसार ते राजभवनात उपस्थित राहिले होते. 

- भाजपच्या मंत्र्यांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; संभाजीराजेंची माफीची मागणी

शपथविधी सोहळ्यानंतर हे सर्व आमदार राजभवनाच्या बाहेर पडले. त्यापैकी काही आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत सर्व प्रकार सांगितला. आणि आम्हाला याची पूर्वकल्पना नव्हती अशी कबूली दिली. अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली, आणि त्यांच्याजागी जयंत पाटील यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आमदार डॉ. शिंगणे यांनी जयंत पाटील यांना पाठिंबा दर्शवत अजित पवार यांच्या हकालपट्टीसाठी सही केली.

- अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी; जयंत पाटील यांच्याकडे सूत्रे

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Rejendra Shingne demanding suspension of Ajit Pawar signed on letter