नव्या राजकीय समीकरणावर रोहित पवार म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. तसेच यावर आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.    

मुंबई : महाराष्ट्रात एक महिण्यापासून सरकार स्थापन होत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी अखेर सत्ता संघर्षाचा पेच सुटला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शनिवारी राजभवनामध्ये सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. तसेच यावर आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.    

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेचे वेध लागलेले असताना भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. तर अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. असं शरद पवारांनी ट्विट केलं आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

दरम्यान, आम्ही जनतेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. राज्यात सत्ता संघर्षानंतर आलेल्या भूकंपाबाबत रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडवणीस यांनी 'त्या' दोन रात्री दिल्ली वारी करून महाराष्ट्र राजकीय ऑपरेशन यशस्वी केले. मागील चार दिवसांत देवेंद्र फडवणीस यांनी मध्यरात्री दिल्लीत जाऊन आले. त्याच रात्री अनेक राजकीय घडामोडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही सत्तास्थापनेचा राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन शनिवारी उभय नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla rohit pawar first reaction on maharashtra govt formation update