देशाच्या अर्थव्यवस्थेवर रोहित पवारांचे पहिल्यांदाच भाष्य; पाहा काय म्हणाले?

NCP MLA Rohit Pawar first time Comment On Indian Economy
NCP MLA Rohit Pawar first time Comment On Indian Economy

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर पहिल्यांदाच भाष्य केले असून त्यांनी राहुल बजाज यांचे समर्थन केले आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहली आहे. रोहित पवार म्हणतात, 'राहुल बजाज यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे'.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

केंद्र सरकार मधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहीत आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्या वरील टिका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली होती. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हेदेखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना उद्देशून राहुल बजाज यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. राहुल बजाज यांनी सरकारवर खुली टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com