बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा; आमदार शिंदेंच्या भावाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश I Satara Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishikant Shinde joins Shiv Sena

ऋषिभाई (Rishikant Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Satara Politics : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा; आमदार शिंदेंच्या भावाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सातारा : सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे बंधू आणि माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे (भाई) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ऋषिभाई (Rishikant Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल सायंकाळी आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील आमदारांवर टीकेची तोफ डागली असतानाच खुद्द त्यांच्या भावानेच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं एकच खळबळ उडालीये.

दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. याप्रसंगी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर, तसेच घणसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.