उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे अखेर सापडले

उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे अखेर सापडले

पुणे : अजित पवार यांच्याबरोबर गेलेले उदगीर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांना शोधून काढण्यात पक्षाला यश आले आहे.

लातूर जिल्ह्यातील बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे दोन आमदार दिवसभर अजित पवार यांच्याबरोबरच असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सायंकाळी संजय बनसोडे यांना शोधण्यात कार्यकर्त्यांना यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे या शोध मोहिमेत राष्ट्रवादीला शिवसेनेने मदत केली. 

आमदार सापडल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे वाय. बी. सेंटरकडे रवाना झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com