खासदार कोल्हेंनी केली आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले...

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

''विधानसभा निवडणुकीपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती. त्यानिमित्ताने कामे काय करायची ते समजले असते''. 

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

बारामती : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती. त्यानिमित्ताने कामे काय करायची ते समजले असते''. 

आदित्य ठाकरे सध्या 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. या यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. त्यावर अमोल कोल्हेंनी टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते युतीच्या वाटेवर असल्याबाबत ते म्हणाले, भाजपचे नेते फक्त वावड्या उठवत आहेत. मात्र, प्रत्यक्ष नावे जाहीर करत नाहीत. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी ही यात्रा काढली असती तर कामांचे मूल्यांकन करता आले असते, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Amol Kolhe Criticizes Aditya Thackeray