... अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'इंशा-अल्लाह!'

NCP-MLA-Dhananjay-Munde
NCP-MLA-Dhananjay-Munde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून राज्यातील राजकीय नाट्याला सुरवात झाली. 

अनेक धक्कादायक घडामोडींची नोंद करत आजचा दिवस उगवला. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर गेलेल्या काही आमदारांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार धनंजय मुंडे हेदेखील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीस आमदार धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. 

धनंजय मुंडे हे स्वगृही परतल्याचे वृत्त समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी ईन्शा-अल्लाह, सर्व काही ठीक आहे, आणि पूर्वीसारखे होईल, अशी प्रतिक्रिया नोंदवली.  

दरम्यान, या सर्व घटना घडत असताना राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे जाहीर केले होते. आणि माध्यमांशी बोलतानादेखील त्यांचे डोळे पाणावले होते. सकाळी घडलेल्या सर्व घडमोडींना उद्देशून त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. आणि त्यामध्ये पक्षात आणि कुटुंबात फूट पडल्याचा उल्लेख केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com