
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु, अभिनंदन.
मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार आज (गुरुवार) स्थापन होत असल्याने तिन्ही पक्षांतील नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजचा सुर्योदय नवा इतिहास रचतोय असे म्हटले आहे.
आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन -@OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु, अभिनंदन. तसेच त्यांनी आज महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्तही ट्विट केले आहे. शोषित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यतिथि. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!
राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.