वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र! नवाब मलिकांचा फोटो शेअर करत खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र,मलिकांचा फोटो शेअर करत खुलासा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB sameer wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (NCP nawab malik) यांनी काल (ता.१८) वानखेडेंच्या शाळेचा दाखल्यासह त्यांच्या जातीविषयक पुरावा सादर केला होता. आज वानखेडेंच्या विरोधात मलिकांनी आणखी एक फोटो ट्विट करत खळबळजनक खुलासा केला आहे.

"Sameer Dawood Wankhede का एक और है यह फर्जीवाड़ा केंद्र"

समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र असे नवाब मलिक म्हणाले आहेत. एका हॉटेलचा फोटो टाकत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या हॉटेलबाबतचे रहस्य काय आहे? याची माहिती अद्याप नवाब मलिक यांनी दिली नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला आणि इतर कागदपत्र कोर्टात सादर केल्यानंतर आता एका हॉटेलचा फोटो ट्विट केल्यामुळे आता नवीन कोणता आरोप करण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; कास्ट सर्टिफिकेटची होणार पडताळणी

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. बोगस ड्रग्ज कारवाई, बोगस जातप्रमाणपत्र आणि पहिल्या पत्नीला धमकावले तसेच तिच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले असे अनेक आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्राबाबत वानखेडेंची चौकशी सुरु आहे. तसेच त्यांची आर्यन खान खंडणी प्रकरणातही एनसीबी एसआयटी टीम चौकशी करत आहे.

हेही वाचा: 'इंदिरा गांधींकडून सावरकरांच्या समर्थनावर काँग्रेसचे काय म्हणणे?'

loading image
go to top