मोठी बातमी - राष्ट्रवादीकडून आलेल्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणतात...

विनोद राऊत
Thursday, 11 June 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉग्रेसकडून विधानपरिषद आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉग्रेसकडून विधानपरिषद आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. ही ऑफर स्विकारण्याचा विचार शेट्टी यांचा असल्याचे समजते आहे.

गेल्या आठवड्यात जंयत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जंयत पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांचा मेसेज शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचवला.  शेट्टी यांनी विधानरपरिषेदव यावे अशी पवारांची इच्छा त्यांनी कानावर घातली. ही ऑफर स्विकारण्यास राजू शेट्टी अनुकूल असल्याचे समजते. पक्षातील इतर नेत्यांसोबत चर्चा करुन लवकरच सकारात्मक निर्णय स्वाभीमानी पक्ष घेणार आहे. 

मोठी बातमी - मुंबईत पुन्हा लागणार कडक लॉकडाऊन ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

लोकसभा निवडणूकीत ठरला होता फार्मुला 

लोकसभा निवडणूकीदरम्यान बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी आग्रही होते.मात्र काही कारणामुळे हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला होता. शेवटी या मतदारसंघाच्या मोबदल्यात पक्षाला विधानपरिषदेची जागा देण्याचे ठरले होते. दरम्यान लोकसभा निवडणूकीत राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला होता. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विधानपरिषदेच्या जागेसाठी राजू शेट्टींना डावलण्यात आले होते. मात्र लवकरचं राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 12 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या  वाट्याला 4 जागा येणे अपेक्षीत आहे. पक्षाच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना आमदारकी देणे निश्चित आहे. 

मोठी बातमी - 'ही' परवानगीही मिळाली, मुंबईतील मद्यप्रेमींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी

काय म्हणालेत राजू शेट्टी :  

जंयत पाटील यांच्याकडून प्रस्ताव आला आहे. पण त्यावर चर्चा सुरु आहे. या आठवड्यात शरद पवार यांची मी भेट घेणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे. - 
राजू शेट्टी, नेते,स्वाभिमानी शेतकरी. 

NCP offers seat of legislative council to raju shetty shetty says will meet sharad pawar and decide 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP offers seat of legislative council to raju shetty shetty says will meet sharad pawar and decide