अजित पवारांना झटका; पक्षाने घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष अजित पवार यांना संसदीय पदापासून दूर ठेवणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पक्षाविरुद्ध बंड केल्यानंतर त्यांचे बंड मोडून काढण्यात पक्षाला यश आले आहे. अवघ्या तीन दिवसांत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष अजित पवार यांना संसदीय पदापासून दूर ठेवणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

केवळ तीन दिवसांत अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यावर महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालेले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मात्र पक्ष सत्तेपासून दूर ठेवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडी स्थापन करण्याचे ठरले होते. महाविकासआघाडीचे सरकार बणणार असल्याचे निश्चित झालेले असातनाच अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 

राज्याचा उपमुख्यमंत्री ठरला!
 
महाराष्ट्रातील राजकारणात एकावर राजकीय भूकंप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा आज (26) राजीनामा दिल्यानंतर कालीदास कोळंबकर यांनी हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली असून त्यांना राज्यपालांनी शपथ दिली. त्यांनंतर आमदाराचा उद्याच शपथविधी होणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. आता राज्यपालांकडे महाविकासआघाडी सत्तास्थापनेसाठी दावा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कालीदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली असल्याचे दिसत आहे. 'अजितदादा, वुई लव्ह यू' अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता अजित पवार यांचे महाविकासआघाडीत 'कमबॅक' होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकच वादा अजित दादा अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून दिल्या जात असतानाच पक्षाने मात्र त्यांना पदापासून दूर ठेवण्यासाठी चर्चा सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP party takes big decision about Ajit Pawar