Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा

Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा

भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिसएशनची निवडणूकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात झालेली युती पाहून सर्वांच्या भुवयां उंचावल्या आहेत. त्यात रामदास आठवले यांनी २०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना साध देणार अस सूचक वक्तव्य केलं. दरम्यान, आशिष शेलार यांना पाठिंबा का दिला? याचा खुलासा स्वतः शरद पवारांनी केला आहे. (Ncp Sharad Pawar Ashish Shelar Mca Elections Cricket maharashtra politics )

एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिसएशनची निवडणूकीच्या युतीसंदर्भात भाष्य केलं आहे. 'आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

'खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही' असा किस्सा शेअर करत शरद पवारांनी होणाऱ्य चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांची नुकतीच बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांनी तयार केलेल्या पॅनलमध्ये खुद्द शरद पवार हेही होते. शरद पवारांनी या निवडणुकीत आशिष शेलार यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात आशिष शेलारांना पाठिंबा का दिला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.