Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांना काय वाटतं?, म्हणाले... | Sharad Pawar On Rahul Gandhi Disqualification | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar On Rahul Gandhi Disqualification

Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांना काय वाटतं?, म्हणाले...

Sharad Pawar On Rahul Gandhi Disqualification : मानहाणी प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यादरम्यन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणालेत की, "आपली राज्यघटना प्रत्येक व्यक्तीच्या न्याय्य न्यायाच्या अधिकाराची हमी देते; विचार स्वातंत्र्य; दर्जा आणि संधीची समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाची खात्री देणारा बंधुभाव."

"राहुल गांधी आणि काही महिन्यांपूर्वी फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, येथे लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आपल्या लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे." असेही शरद पवार आहेत.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान भाजपने मात्र भगवान के घर देर है, अंधेर नही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण?

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.