राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना आवरले; बोलण्याचा अधिकार फक्त मलिकांनाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका फक्त नवाब मलिक माध्यामानसमोर मांडतील, असा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला आहे. सत्ता संघर्षावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याना बोलायला बंदी घालण्यात आली आहे. वादग्रस्त विधाने टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली आहे.

मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने माध्यमांसमोर बोलण्याचे पूर्ण अधिकार आमदार नवाब मलिक यांना दिले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका फक्त नवाब मलिक माध्यामानसमोर मांडतील, असा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला आहे. सत्ता संघर्षावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याना बोलायला बंदी घालण्यात आली आहे. वादग्रस्त विधाने टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली आहे.

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP spokeperson Nawab Malik clear stand about party in Maharashtra