Girish Mahajan : 'गिरीश महाजन गुंडांसोबत प्रचार करतायत'; जन्मठेपेतल्या आरोपीचं नाव घेऊन NCP ची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rupali patil thombre on Girish Mahajan

Girish Mahajan : 'गिरीश महाजन गुंडांसोबत प्रचार करतायत'; जन्मठेपेतल्या आरोपीचं नाव घेऊन NCP ची टीका

पुणेः कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असून आज राष्ट्रवादीने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाजन यांच्यावर थेट आरेप केले आहेत. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत मंत्री गिरीश महाजन हे गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पुण्यातील संदीप मोहोळ खून प्रकरणात ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यापैकी संतोष लांडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर याआधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. या संतोष लांडेने तो गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपला अनेकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. कसबा पोटनिवडणूक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केला आहे. मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :girish mahajan