Loksabha 2019 : माढ्याची उमेदवारी विजयसिंहांनाच मिळणार होती : जयंत पाटील

Jayant Patil
Jayant Patil

मुंबई : विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पवारसाहेबांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळविण्यात आले होते, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर  पाटील म्हणाले, की पक्षाच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविले, विद्यमान खासदारही आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हेही खासदार होते. आताही विजयसिंह मोहिते पाटील यांनाच पक्ष उमेदवारी देणार होता; परंतु त्यांनी दुसरे नाव दिले. त्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याआधीच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. २०) पक्ष सोडला. 

माढा मतदारसंघात आम्ही सक्षम उमेदवार देऊ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com