नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुण्यासह लातूरमधील नगरपालिकांसाठी 324 जागांसाठी 1345 उमेदवार रिंगणात होते. निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीला सर्वाधिक म्हणजे 107 जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाला 81, काँग्रेस 31 व शिवसेनेला 23 जागा मिळाल्या आहेत.

पुणेः पुणे जिह्ल्यातील दहा व लातूर जिल्ह्यातील चार अशा चौदा नगरपालिकांचे निकाल आज (गुरुवार) जाहिर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा 107 जागा मिळाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील बारामती व लोणावळा नगर पालिका वगळता अन्य आठ ठिकाणी सरासरी 73.67 टक्के मतदान झाले होते. पुणे जिल्ह्यातील बारामतीसह इंदापूर, जेजुरी, सासवड, दौंड, शिरूर, जुन्नर, आळंदी आदी निकालांबाबत उत्सुकता होती. पुणे जिल्ह्यात नगरसेवकांची 223 पदे असून, त्यासाठी 894 उमेदवार रिंगणात होते.

पुण्यासह लातूरमधील नगरपालिकांसाठी 324 जागांसाठी 1345 उमेदवार रिंगणात होते. निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीला सर्वाधिक म्हणजे 107 जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाला 81, काँग्रेस 31 व शिवसेनेला 23 जागा मिळाल्या आहेत. 36 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. सासवड येथील जनमत विकास आघाडीला 17 जागा तर शिरूर येथील शिरूर विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष
नगरपालिका --- नगराध्यक्षांचे नाव --- पक्ष या क्रमाने
1) बारामती --- पौर्णिमा तावरे --- राष्ट्रवादी काँग्रेस
2) इंदापूर --- अंकिता शाह --- काँग्रेस
3) दौंड --- शीतल कटारिया --- रासप व नागरिक हित संरक्षण आघाडी
4) शिरूर --- वैशाली वाखारे --- शहर विकास आघाडी
5) जेजुरी --- वीणा सोनवणे --- काँग्रेस
6) सासवड --- मार्तंड भोंडे --- काँग्रेस
7) जुन्नर --- श्‍याम पांडे --- शिवसेना
8) आळंदी --- वैजयंता उमरगेकर --- भाजप
9) लोणावळा --- सुरेखा जाधव --- भाजप
10) तळेगाव दाभाडे --- चित्रा जगनाडे --- भाजप

Web Title: NCP won maximum seats in municipal council polls