राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी संग्राम कोते-पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - संग्राम कोते पाटील यांची राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. विद्यमान युवक प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

मुंबई - संग्राम कोते पाटील यांची राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. विद्यमान युवक प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी माफीसाठी कोते पाटील यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या समाधानकारक कामगिरीमुळे त्यांना पक्षसंघटनेत बढती देत युवक प्रदेशाध्यक्षदी नेमण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कोते पाटील यांना आज नियुक्‍तीचे पत्र दिले. युवकांचे पक्षसंघटन मजबूत करण्याचे काम संग्राम कोते पाटील करतील, असा विश्‍वास तटकरे यांनी या वेळी व्यक्‍त केला.

Web Title: ncp youth president sangram kote-patil