मुख्यमंत्र्यांच्या कवितेला राष्ट्रवादीचे कवितेतूनच प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूूब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना त्यांच्याच पद्धतीने कविता करत उत्तर दिले. आहे. या कवितेतून शेख यांनी फडणवीसावर भ्रष्टचारी मंत्र्यांनी क्लिन चिट देण्यापासून ते खोटे स्वप्न दाखवले असल्याचे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी `मी पुन्हा येईन/ नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी/ जलयुक्‍त शिवारासाठी/ दुष्काळ मिटवण्यासाठी/ युवामित्रांना शक्‍ती देण्यासाठी अशा कवितेच्या ओळी सादर केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूूब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर देताना त्यांच्याच पद्धतीने कविता करत उत्तर दिले. आहे. या कवितेतून शेख यांनी फडणवीसावर भ्रष्टचारी मंत्र्यांनी क्लिन चिट देण्यापासून ते खोटे स्वप्न दाखवले असल्याचे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवककडून करण्यात आलेली कविता

मी पुन्हा येईन भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्लिन चीट देण्यासाठी ... 
मी पुन्हा येईन तरुणाची बेरोजगारी वाढवण्यासाठी ..
मी पुन्हा येईल जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ...
मी पुन्हा येईल खोटे स्वप्न दाखवण्यासाठी ...
मी पन्हा येईल जलयुक्त मध्ये अजुन मोठा घोटाळा करण्यासाठी ...
मी पुन्हा येईल आणखी शेतकर्याच्या आत्महत्या पाहण्यासाठी ..... 
मी पुन्हा येईल मुंबई करांचे हाल पाहण्यासाठी ... 
मी पुन्हा येईल महाराष्ट्र चे पाणी गुजरात ला देण्यासाठी .... 
मी पुन्हा येईल भिषण दुष्काळा मध्ये शेतकऱ्यांना छळुन त्याचं राजकारण करण्यासाठी ...
मी पुन्हा येईल भाजपमधील मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी ..... 
मी पुन्हा येईल वारीत साप सोडणार होते म्हणण्यासाठी ..... 
मी पुन्हा येईल मंत्रालयातील करोडो उंदीरे मारण्यासाठी .... 
मी पुन्हा येईल सुडाचे राजकारण करण्यासाठी ... 
मी पुन्हा येईल भाजपाचे निष्ठावंत डावलून आयारामाना मंत्री करण्यासाठी .... 
मी पुन्हा येईल धनगर समाजाला फसवण्यासाठी ..

मी पुन्हा येईल अजुन बरंच काही करण्यासाठी ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Mehboob shaikh answers to the poem of Chief Minister