esakal | "ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन्‌ ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण?'
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी "आता नवा वसुली मंत्री कोण?' असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत शब्दांत पलटवार केलाय

"ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन्‌ ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण?'

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : "ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून, त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत "पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत' हे म्हणायची वेळ येईल,' अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता पलटवार केलाय. 

https://www.facebook.com/177300259309608/posts/1355365978169691/

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर या प्रकरणी ऍड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपण राजीनामा देत आहे, असे पत्र अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यावर चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. 

"राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?' असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर रूपाली चाकणकर चित्रा वाघ यांना नाव न घेता फेसबुक पोस्ट करून जोरदार उत्तर दिलंय. 

फेसबुक पोस्ट करून रूपाली चाकणकर म्हणतात, "ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून, त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत "पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत' हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा !' 

loading image