राष्ट्रवादीने बदलला चेहरा; कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा, तर उदयनराजे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.  शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.  शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होणार आहे. रोज 3 विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहेत.  पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे संपेल.

16 ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष  म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncps shiv swarajya yatra lead amol kolhe from 6 august