राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु

ncp.jpg
ncp.jpg

पैठण : महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. औरंगाबादमधील पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्हयात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरग्रस्तांना मदत करण्यास उतरली होती. अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांना दिलासाही दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पैठण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com