सर्वंकष ऍप तयार करणे गरजेचे - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - डिजिटल पेमेंटस्‌ करण्यासाठी सर्व बॅंकांना वापरता येईल असे सर्वंकष मोबाईल ऍप्लिकेशन तयार करून त्यामध्ये जिल्हा सहकारी, प्रादेशिक बॅंका यांचा समावेश करावा. यामुळे त्याचा ग्रामीण भागात प्रभावीपणे वापर करता येणे शक्‍य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

निती आयोगाच्या अंतर्गत डिजिटल पेमेंटचा दैनंदिन जीवनात वापर वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून फडणवीस सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीमध्ये समितीचे नियंत्रक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डिजिटल सल्लागार नंदन निलकेणी आणि इतर तज्ज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. येत्या तीन महिन्यांत दहा लाख पीओएस मशीन वितरित करण्यात येतील. यामुळे कॅशलेस व्यवहार करण्यास चालना मिळेल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. सर्व बॅंकांना या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता यावे यासाठी सर्वंकष मोबाईल ऍप, विकसित करणे, आधार कार्डचा वापर करून चलनविरहित व्यवहार करणे, अशा विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

Web Title: The need to develop a comprehensive app - Minister