राज्यात ‘टाटा’सारख्या तीन रुग्णालयांची गरज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

मुंबई - टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यात किमान तीन रुग्णालयांची गरज आहे. भविष्याची गरज ओळखून चार कोटी लोकसंख्येमागे ३०० खाटांचे एक अशी २० रुग्णालये आवश्‍यक आहेत, अशी शिफारस काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या स्थायी समितीने केली आहे. या समितीने देशातील कर्करोगाच्या उपचारांबाबतचा अहवाल सादर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. २०१८ मध्ये राज्यात नव्याने एक लाख ४४ हजार ३२ कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. संसदीय समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार ३० ते ४० हजार रुग्णांसाठी एक रुग्णालय आवश्‍यक आहे. समितीने कर्करोग रुग्णालयाचे ‘हब’ आणि ‘स्पोक्‍स’ अशा दोन मॉडेलची शिफारस केली आहे. 

यात हब ५० एकरवरील ३०० खाटांचे रुग्णालय असेल. ज्यात महत्त्वाचे उपचार केले जातील. त्याखालोखाल १०० खाटांचे स्पोक्‍स रुग्णालय ५० लाख ते १ कोटी लोकसंख्येमागे एक असेल. वर्षाला सहा ते आठ हजार रुग्णांवर यामुळे उपचार करता येतील,  असेही समितीने अहवालात नमूद केले आहे.

ही दोन्ही प्रकारची रुग्णालये विमानतळे, रेल्वे स्थानक आणि रस्तेमार्गाला जोडणाऱ्या जागेत असावीत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाशीही जोडलेले असावे, अशी शिफारसही करण्यात समितीने केली आहे.

कुठे कोणते उपचार? 
स्पोक्‍स सेंटर आणि हब एकमेकांच्या सहकार्याने काम करतील. स्पोक्‍स रुग्णालयांत रेडिएशन, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपीही होतील, तर हब सेंटरमध्ये महत्त्वाच्या आणि गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया, उच्च दर्जाचे रेडिएशन, बोन मॅरो आदी पद्धतीचे उपचार होतील.

No photo description available.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need for three hospitals like Tata