मोदींविरोधात विचारांच्या ऐक्‍याची गरज - पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई - सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायी नेता कोण? असा सवाल जाणीवपूर्वक विचारला जात आहे. मात्र, मोदीविरोधात नेत्यांची नव्हे, तर विचारांच्या ऐक्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

केंद्र सरकारने अविश्‍वास प्रस्ताव जिंकल्याचा आनंद भाजप साजरा करत आहे. मात्र, हा अविश्‍वास संख्येच्या जोरावर नव्हे तर सरकारच्या धोरणांच्या विरोधात होता. देशात सध्या जे एकविचारी वातावरण आहे ते देशाच्या एकतेसाठी घातक आहे. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन २०१९च्या निवडणुकीत मोदींसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पवार म्हणाले. मोदी हे गांधी व नेहरू घराण्यांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करतात, हे दुःखदायक असल्याचे पवार म्हणाले.

जनतेने ठरविले की पराभव अटळ!
१९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्यासमोरदेखील कोणी तग धरेल असा चेहरा अथवा नेता नव्हता. याचा दाखला देत मोदी यांनी पर्यायी नेता कोण, या भ्रमात राहू नये. जनतेने एकदा ठरवले की पराभव अटळ आहे, असा इशारा देत २०१९ मध्ये चेहरा अथवा नेता नव्हे तर या देशातला मानवतावादी विचारच मोदी यांच्या पराभवास सक्षम असल्याचा दावा पवार यांनी या वेळी केला.

Web Title: Need for unity of ideas against Modi sharad pawar