साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

शिर्डी - रिलायन्स उद्योगसमूहाच्या नीता अंबानी यांनी शुक्रवारी दुपारी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांनी काही वेळ प्रार्थना केली.

शिर्डी - रिलायन्स उद्योगसमूहाच्या नीता अंबानी यांनी शुक्रवारी दुपारी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांनी काही वेळ प्रार्थना केली.

दर्शनानंतर अंबानी यांचा साईबाबा संस्थानातर्फे सत्कार करण्यात आला. साईसमाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रिलायन्स उद्योगसमूहाच्या सामाजिक दायित्व निधीतून शहराच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा नगराध्यक्ष योगिता शेळके यांनी व्यक्त केली. त्यास होकार देताना अंबानी यांनी तसा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.

Web Title: neeta ambani in shirdi for saibaba darshan