नेहरूंच्या आग्रहाखातर सौदी अरेबियाचा राजा थेट काशीला आला होता

सौदी अरेबियाचे भारतासोबतचे घनिष्ट संबंध नजरेसमोर आले की नेहरू सत्तेत असताना सौदी अरेबियांच्या राजेंचा भारत दौरा आठवतो.
सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ आणि जवाहरलाल नेहरू
सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ आणि जवाहरलाल नेहरूsakal

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur sharma) आणि नेते नवीन कुमार जिंदाल (Naveen jindal) यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही वातावरण ढवळून निघाले.

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली. या देशांमधील असलेली नाराजी सध्या भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया, बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य अनेक देशांचा समावेश आहे.

सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ आणि जवाहरलाल नेहरू
PNB Fraud Case : ईडीकडून मेहुल चोक्सीसह पत्नी विरोधात आरोपपत्र दाखल

आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्य करतात. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. याशिवाय राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. यातलाच भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला देश म्हणजे सौदी अरेबिया.

सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ आणि जवाहरलाल नेहरू
हज यात्रेस या वर्षी ‘कहीं खुशी कहीं गम’ असल्याचे चित्र

सौदी अरेबिया हा सर्वांगिणदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. स.न १९९१ मध्ये यू.एस.एस.आर च्या विभाजनानंतर शीतयुद्ध समाप्त झाले. त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरण, जागतिकीकरण व खासगीकरणाचे वारे वाहत होते. भारताने आपली अर्थव्यवस्था खुली केली. परिणामी अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यात सौदी अरेबियाच्या अनेक सरकारी तेल व ऊर्जा कंपन्या होत्या. अशाप्रकारे व्यावसायिक पातळीवर भारत व सौदी अरेबिया यांच्यातील मैत्री संबंध सुरू झाले मात्र आज या मैत्रीवर बदलांचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ आणि जवाहरलाल नेहरू
PNB Fraud Case : ईडीकडून मेहुल चोक्सीसह पत्नी विरोधात आरोपपत्र दाखल

सौदी अरेबियाचे राजे यांची भारत भेट

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्यामुळे सौदी अरेबिया आणि भारतात तुट पडू शकते. पण याचवेळी सौदी अरेबियाचे भारतासोबतचे घनिष्ट संबंध नजरेसमोर आले की नेहरू सत्तेत असताना सौदी अरेबियांच्या राजेंचा भारत दौरा आठवतो. आजही या दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होते.

1955 मध्ये सौदी अरेबियाचे राजे सौद बिन अब्दुल अझीझ (Abdul Aziz Ibn Saud ) भारत भेटीला आले होते तेव्हा नेहरू सरकारने त्यांची काशी येथे हत्तीच्या पाठीवर मिरवणुकीत काढत जंगी स्वागत केले होते. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्वागतासाठी मिरवणूक काढली असावी.यावेळी सौद बिन अब्दुल अझीझ यांनी खडकवासला येथील इंडियन मिलिटरी अकादमीलाही भेट दिली होती आणि कमांडंटला सोन्याची तलवार भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com