सोशल मीडियावर फक्त संजय राऊत यांचीच चर्चा; मिम्सचा धुमाकूळ

टीम ई-सकाळ
Saturday, 2 November 2019

'महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर शिवसेना रंग भरणार आणि त्याचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.'

सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती सत्ता स्थापन करण्याबाबतची. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युती पक्षांमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची. 

Image may contain: 2 people

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून संजय राऊतांनी आपली भूमिका लावून धरली आहे. आज संजय राऊत काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष्य लागून राहत आहे. त्यामुळे स्वपक्षीय, मित्रपक्ष आणि विरोधही धास्तावले आहेत. या एकूण प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर झाली नाही तर नवलचं! नेटकऱ्यांचे लक्ष्यही राऊतांच्या भूमिकेकडे लागले असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस होत आहे. 

Image may contain: 1 person, text

संजय राऊत यांची गेल्या काही दिवसांतील विधाने :-  

 

- महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर शिवसेना रंग भरणार आणि त्याचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. 

- दिलेला शब्द पाळायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसेनेने कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही.

- भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा, फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूलानुसारच मुख्यमंत्री पदाचंही समसमान वाटप व्हावं.

- 'विनाशकाले विपरित बुद्धी' ही आमची नाही, तर भाजपची अवस्था आहे. 

Image may contain: 2 people, text

- महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरवणार आहोत. 

- साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कई सिकन्दर डूब गए..!

- सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आधी ईडी व आता राष्ट्रपतींना या विषयात आणून ते धमकीची भाषा करत आहेत.

Image may contain: text

त्यानंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

Image may contain: 1 person, text

मात्र, या सर्व घडामोडींमुळे ते दररोज चर्चेत राहिले. आता जो पर्यंत मुख्यमंत्री आणि जागा वाटप होत नाही, तोपर्यंत खासदार राऊत सतत चर्चेत राहतील. कारण त्यांची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'मलईदार' खात्यात अडकला युतीचा वारू; तणाव शिगेला

- महाराष्ट्रात लागणार फेरनिवडणुका? जाणून घ्या सट्टेबाजारातील आतल्या खबरी

- ही पाहा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..

Image may contain: one or more people, horse and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens commenting about Shiv Sena leader Sanjay Raut on social media