
अर्थसंकल्पाचं कौतुक करताना अमृता फडणवीसांना भावना अनावर झाल्यात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे भल्याभल्यांना भूतकाळात जाऊन चाचपण्याची वेळ आली आहे.
नागपूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्व विषयांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया आल्याशिवाय राहत नाही. यामुळे त्या नेहमीच वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. यावेळीही असंच काहीसं घडलंय. सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पाचं कौतुक करताना अमृता फडणवीसांना भावना अनावर झाल्यात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे भल्याभल्यांना भूतकाळात जाऊन चाचपण्याची वेळ आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. देशात याबाबत प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. अमृता फडणवीसांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली. पण सरकारचं कौतुक करताना त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांना वर्षांचंसुद्धा भान राहिलं नाही असंच म्हणावं लागेल.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षं झालीत तर १९४७ रोजी देशात पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला मात्र असा अर्थसंकल्प गेल्या १०० वर्षांत बघितला नाही असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. त्यामुळे स्वांतत्र्यच्या आधीही अर्थसंकल्प सादर होत होता असं अमृता फडणवीसांना वाटतंय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Thank you FM Smt @nsitharaman for presenting budget in a manner never seen in a 100 years in India.
All countries in the world will now observe and learn the art of giving impetus to growth without levying additional tax. #Budget2021 #UnionBudget2021 #NirmalaSitaraman
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 1, 2021
त्यांच्या या ट्विटनंतर अनेकजण त्यांना या मुद्द्यावरून ट्रोल करत आहे. अनेकांनी तर त्यांना ही बाबही लक्षात आणून दिली आहे. स्वातंत्र्याला १५० वर्षं झालीत का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात येतोय.
नोव्हेंबर १९४७
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोव्हेंबर १९४७ रोजी देशात पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शानुखम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात तब्बल ४६ टक्के निधी हा सुरक्षा क्षेत्राला देण्यात आला होता.