राज्यात नव्याने सापडले दहा हजार कुष्ठरुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

देशाला २०२२ पर्यंत कुष्ठरोगापासून मुक्‍त करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असतानाच राज्यातील कुष्ठरुग्ण कमी होण्याऐवजी वाढत आहेत. 

गेल्या २०१८-१९ मध्ये राज्यात १५ हजार २९९ कुष्ठरुग्ण होते, तर एप्रिल ते ऑगस्ट २०१९ पर्यंत दहा हजार कुष्ठरुग्ण नव्याने सापडले आहेत.

सोलापूर - देशाला २०२२ पर्यंत कुष्ठरोगापासून मुक्‍त करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असतानाच राज्यातील कुष्ठरुग्ण कमी होण्याऐवजी वाढत आहेत. 

गेल्या २०१८-१९ मध्ये राज्यात १५ हजार २९९ कुष्ठरुग्ण होते, तर एप्रिल ते ऑगस्ट २०१९ पर्यंत दहा हजार कुष्ठरुग्ण नव्याने सापडले आहेत.

राज्यभरातील ३२ हजार संशयितांची तपासणी अद्याप झालेली नाही. दरवर्षी सुमारे ४० कोटींचा खर्च करूनही कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कुष्ठरुग्ण बरे व्हावेत, या उद्देशाने अनेक संशोधने झाली. विविध औषधांचाही शोध लागला. मात्र, देशातील कुष्ठरुग्ण अद्याप कमी झालेले नाहीत. देश पातळीवर कुष्ठरुग्णांचा शोध व उपचारासाठी दरवर्षी सुमारे दोनशे कोटींचा खर्च केला जातो, तर राज्यातील खर्चही सुमारे ३५ कोटींपर्यंत असल्याचे कुष्ठरोग निर्मूलन विभागातील सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 10 Leprosy patient in state healthcare