'लालपरी'ने केलं 'इलेक्ट्रीक शिवाई'चं स्वागत! ताफ्यात 150 बस दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मुंबई : एसटीच्या ताफ्यात आता 'शिवाई' या इलेक्ट्रीक बस दाखल होणार असून, काल (ता. 5) या बसचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली या बसची संकल्पना मांडण्यात आली व ती सत्यात उतरवण्यात सरकारला यश आले. एकदा चार्ज केल्यानंतर एसटी किमान 300 किमीचा पल्ला गाठणारी शिवाई ही बस नजिकच्या दोन शहरांमध्ये चालवली जाणार. एसटीच्या ताफ्यात लवकरच दीडशे शिवाई बसेस दाखल होणार.

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती करताना उद्धव ठाकरेंनी पुढचं सरकार आपलं असणार असं वक्तव्य केलं. त्यानंतर थोडं थांबून पुढचा.... आणि पुन्हा थोडं थांबून थेट उपस्थितांनाचा प्रश्न विचारला. पुढचं तुम्हाला काय ते कळलं असेल? असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे भाजपनंतर शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.

शिवाई 'एसटी'च्या ताफ्यात दाखल झाल्याने परिवहन विभागाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 150 electric bus shivai enter in transport department