हा पण चौकीदार झोपलेलाच : राज ठाकरे

cartoon
cartoon

मुंबई : आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. ''देशाचे हजारो कोटी रूपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान मोदींनी समाजमाध्यमांवर त्यांच्या नावासमोर 'चौकीदार' लिहून अधिकृत जाहीर केलं आहे.' असे ट्विट करत मनसे अधिकृतवरून व्यंगचित्र शेअर केले आहे.

'बँक ऑफ विश्वास' अशा नावाची बँक दाखवून त्यातून नीरव मोदी, मल्ल्या असे घोटाळेबाज गैरव्यवहार करून पैसे घेऊन पळून चालले आहेत. तर बाहेरच्या बाजूला मोदी व जेटली 'चौकीदाराच्या' रूपात झोपा काढत आहेत. सामान्य ठेवीदारम्हणत आहेत, की आधीचे नालायक आहेत असे सांगितले म्हणून आपण वॉटमन बदलला पण हेही झोपाच काढत आहेत आणि परिस्थिती तीच आहे. असे झणझणीत व्यंगचित्र काढून राज यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असं म्हणत मोदींवर टीका केली होती. तर भाजपने आता 'मैं भी चौकीदार' असे कॅम्पेन सुरू केले आहे. काल पासून भाजप मधील सर्व मोठ्या नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावून आपली नावे बदलली आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच राज यांनी व्यंगचित्र काढत पुन्हा एकदा मोदींना टोला लगावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com