महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल... 'हा' आहे नवीन फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीच्या नव्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला १५ मंत्रिपदं मिळणार आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपद, तसंच ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं वाट्याला येणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला १२ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ४ राज्य मंत्रिपदं मिळणार आहेत.

 मुंबई ः तब्बल एक महिण्याच्या घाडमोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सध्या निर्णयांचा धडाका लावला आहे. परंतू महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल केल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, नव्या बदलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि १५ मंत्रिपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं देण्यात येणार होती. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसला १६ मंत्रिपदं मिळणार आहेत. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

महाविकास आघाडीच्या नव्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला १५ मंत्रिपदं मिळणार आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपद, तसंच ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं वाट्याला येणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला १२ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ४ राज्य मंत्रिपदं मिळणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश असेल. तर काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदं अशी एकूण १२ मंत्रिपदं मिळतील. तसंच विधानसभा अध्यक्षपदही काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांचा समावेश होता. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसकडून नितीन देसाई आणि बाळासाहेब थोरात यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New formula of Mahavikasaghadi in Maharashtra Politics