नव्या नोटा देताहेत अंधांना चकवा 

अजित झळके
सोमवार, 17 एप्रिल 2017

सोलापूर - नोटबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, याविषयीची मतमतांतरे कायम आहेत. त्यावर चर्चेचा खल होत राहील, मात्र नव्या नोटा चलनात आल्यापासून राज्यातील अंधांना हैराण करून सोडले आहे. पाचशे आणि दोन हजार रुपयांची नवी नोट अंधांना चकवा देत आहे. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांचा आकार, जाडी हीदेखील जवळपास एकसारखी झाल्याने नाणीही गोंधळ वाढवत आहेत. अंधांच्या शाळा, विद्यालयांमध्ये अद्यापपर्यंत नव्या नोटांचे ज्ञान देणाऱ्या "नोटेक्‍स फ्रेम' उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांची अधिक पंचाईत झाली आहे. 

"शंभर समजून पाचशेची नोट दिली', असा अनुभव अलीकडे डोळस लोकांनाही येऊ लागला आहे. एका कटाक्षात नव्या नोटांना ओळखणे जर डोळस नागरिकांना कठीण जात असेल, तर अंधांची स्थिती काय असेल? याविषयी सोलापूर येथील राजीव गांधी मेमोरियल स्कूलमधील कलाशिक्षक बी. जी. कारभारी यांनी उलगडा केला. अंध शाळेतील विद्यार्थ्यांना नोटांची ओळख व्हावी, यासाठी "नोटेक्‍स फ्रेम' असते. दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजार रुपयांच्या नोटेच्या फ्रेम या शाळांमध्ये उपलब्ध होत्या. त्यांचा आकार, जाडी व अन्य बारकावे अभ्यासून अंधांना नोट ओळखणे शक्‍य व्हायचे. वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडकडून या फ्रेम तयार करून दिल्या जायच्या. नोटबंदी झाल्यानंतर पाचशे व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. त्याला साडेतीन ते चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु या नोटा ओळखणे अंधांना कठीण होत आहे. पाचशेच्या नोटेचा आकार बदलला आहे, दोन हजाराची नोट खूपच छोटी आहे. या आकाराला मिळत्या जुळत्या दहा व वीस रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्यामुळे अंधांना व्यवहार करताना शेजाऱ्याची मदत घ्यावी लागते, असा अनुभव कारभारी यांनी सांगितला. हीच परिस्थिती नाण्यांबाबत आहे
आम्ही विद्यार्थ्यांना नोटेच्या आकाराची विविध साधने बनवून नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण देतोय, मात्र ते परिणामकारक ठरत नाहीये. नोटेक्‍स फ्रेमच उपयुक्त आहेत, मात्र त्या उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वच अंधांना नोटबंदीनंतर हैराण करून सोडले आहे. 
- बी. जी. कारभारी, कलाशिक्षक, राजीव गांधी मेमोरियल स्कूल, सोलापूर 

Web Title: new notes Het blind