ठरलं ! वंचित आघाडी लढणार 'या' नव्या निवडणूक चिन्हावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी गॅस सिलींडर या निवडणुक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपला उमेदवार उभा करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले होते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी गॅस सिलींडर या निवडणुक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपला उमेदवार उभा करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले होते.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितने तयारी सुरू केली असून लोकसभा निवडणुकांवेळी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलं आहे.

वंचितला गॅस सिलेंडर हे चिन्हे देण्यासोबतच संभाजी ब्रिगेडला शिलाई मशिन हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितचे चिन्ह गॅस सिलेंडर हे असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new sign to the deprived Bahujan front, the assembly will contest on this gas cylender