esakal | पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांसाठी 'का' केले असे ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

tweet

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या तिन्ही पक्षांमध्ये चर्चांना सुरवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आगोदर चर्चा होऊन प्रस्ताव शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्री बैठक होणार होती. त्यापूर्वीच वृत्तवाहिन्यांवर अजित पवार नाराज असल्याचे दाखविण्यात आले आणि बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांसाठी 'का' केले असे ट्विट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडीच्या बैठकांना सुरवात होत असताना माध्यमांकडून आततायीपणा आरोप होत आहे. याला उद्देशून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत वृत्तवाहिन्यांमध्ये येत असल्याच्या  बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या तिन्ही पक्षांमध्ये चर्चांना सुरवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आगोदर चर्चा होऊन प्रस्ताव शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्री बैठक होणार होती. त्यापूर्वीच वृत्तवाहिन्यांवर अजित पवार नाराज असल्याचे दाखविण्यात आले आणि बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. एका वृत्तवाहिनीने पृथ्वीराज चव्हाणांनी बैठक रद्द झाल्याची माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी ट्विट करत अशा खोट्या बातम्या पसरविणे बंद करा असे म्हटले. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असून, माध्यमांकडून निराधार बातम्या पसरविण्यात येत असल्याचे सांगितले.

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यामध्ये सत्तास्थापनेस काँग्रेसमुळे विलंब झालेला नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बैठक ही 2 हजारांच्या नोटेत असलेल्या नॅनो चीपप्रमाणे असल्याचे माध्यमांकडून करण्यात येईल, असे काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान