गृहरक्षक दलातील तरुणाची मृत्यूशी झुंज 

tanaji-jadhav
tanaji-jadhav

करमाळा - करमाळा येथील तानाजी विठ्ठल जाधव (वय 36, रा. सावंत गल्ली) या गृहरक्षक दलात (होमगार्ड) काम करणाऱ्या तरुणाला अचानक किडन्याच्या विकाराने ग्रासल्याने तो मृत्यूशी झुंज देत आहे. मुलाला जगवण्यासाठी आई-वडलांची धडपड सुरू असून त्यांना मदतीची गरज आहे. तानाजीला दररोज डायलिसिस करावे लागत असून किमान दोन हजार रुपये दररोजचा खर्च होत आहे. यासाठी किडनी ट्रासप्लॅन्ट करणे गरजेचे बनले आहे. 

पुणे येथे जहांगीर रुग्णालयात त्याला दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वडिलांची किडनी काढून तानाजीला ती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किडनी मॅच झाली आहे. ती बसविण्यासाठी (ट्रासप्लॅन्ट) करण्यासाठी सुमारे सात ते दहा लाख रुपयांचा खर्च येत आहे. घरामध्ये जबाबदार व धावपळ करणारा एकही व्यक्ती नसल्याने तानाजीचा जीवनमरणाचा खेळ सुरू झाला आहे. 

जाधव यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई-वडील मजुरी करून गुजराण करतात. आई दुसऱ्याच्या शेतात व धुणीभांडी करते तर वडील एसटी कॅटीनमध्ये हॉटेलात काम करत आहे. तानाजी जाधव यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सहा महिन्यांपासून त्यांना किडन्याची आजार सुरू झाला. अचानक दोन्ही किडन्यांनी हळूहळू निकाम्या झाल्या आहेत. गृहरक्षक दलाचे काम करत असताना उदरनिर्वाहासाठी गेल्या चार वर्षांपासून लाइट फिटिंगचे तो काम करत होता. या वेळी तो काम करताना शिडीवरून पडण्याचे निमित्त झाले होते. त्यावेळी तो चार तास बेशुद्ध पडला होता. त्यावेळी वापरलेल्या कडक औषधांचा दुष्परिणामाने किडन्याचे कार्य बंद पडले असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. हळूहळू किडन्यांची कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांना दररोज डायलिसिस करावे लागत आहे. 

तानाजीच्या आईचे मदतीचे आवाहन 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तानाजी जाधव हा काम करून घरचा कर्ता बनला होता. तो एकुलता एक असल्याने कुटुंब विस्कटण्याच्या मार्गावर आहे. त्याला आर्थिक मदतीची अंत्यत गरज आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे अवाहन तानाजीची आई छबुबाई जाधव (वय 55, रा. करमाळा) यांनी केले आहे. तानाजी विठ्ठल जाधव, युनियन बॅंक ऑफ इंडिया, खाते करमाळा यांचा खाते क्रमांक 470502010126880 आयएफएससी कोड क्रमांक यू बी आय एन 0547051 असा आहे. दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन जाधव कुटुंबीयांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com