निघोजचे सैराट प्रकरण वेगळ्या वळणावर; पतीनेच दिले पेटवून?

निघोजचे सैराट प्रकरण वेगळ्या वळणावर; पतीनेच दिले पेटवून?

पारनेर: निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा प्रकार ऑनर किलीगचा नसून पतीनेच पत्नीला जाळून मारल्याचा संशय पोलिसांना आहे.

आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर राज्याभरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तपास वेगाने सुरू केला. या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक मनिष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

घटना घडल्यानंतर घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे व रुख्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यानंतर हे सैराट प्रकरण नसून मंगेशनेच रूख्मिणीला पेटवून मारल्याच प्रथम दर्शनी समोर आले आहे. मंगेशने पेटवून दिल्यानंतर रुख्मिणीने मंगेशला मिठी मारली. त्यात मंगेश भाजला असल्याचे तपासात आढळून आले आहे.

स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रुख्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटूंबांचा विरोध नव्हता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच गुन्हेगारी प्रवत्तीच्या मंगेशने रुख्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून तो तीला बेदम मारहाण करीत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुख्मिणीला मारहाण केली होती. मारहाणीला कंटाळून रुख्मिणी गावातील आपल्या माहेरी निघून आली.

रुख्मिणी माहेरी आली असली तरी मंगेश कधीही येवून त्रास देईल ही भिती होती. या भितीने रुख्मिणीची आई बाहेर गेली असताना रुख्मिणी व तीच्या लहान भावंडाना घरात ठेऊन दाराला बाहेरुन कुलुप लावून गेली होती. त्या दिवशीही घरात रुख्मिणीसह तिची लहान भावंडे, निंचू (वय 6), करिश्‍मा (वय 5) विवेक (वय 3) घरातच होते. वडीलही सकाळीच  बाहेर गेले होते.  01 मे रोजी मंगेशने घराच्या मागच्या बाजूने, पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. ते रुख्मिणीच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. रुख्मिणीने पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली. ही बाब रुख्मिणीचा लहान भाऊ निंचूने पोलिसांना सांगीतली आहे.

मुलींच्या वडीलांना घेतले ताब्यात 
पोलिसांनी या प्रकरणी मामा व काकाला अटक केली आहे. आज मुलीचे वडील रामा भरतीया याला ताब्यात घेण्यात आले आहे. छोट्या भावाने सांगितले असले तरी तो जबाब कोर्टात ग्राह्य धरण्यात येत नाही. शिवाय तो मयत मुलीचा भाऊ आहे त्यामुळे तो तिच्याच बाजूने बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेळी चर्चा आज त्यामुळे दोनही बाजूने तपास सुरू आहे अद्याप खात्री काहीच नाही, पोलिस उपाधिक्षक मनीष कळवनिया यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com