'तू सटकला लेका, उंची व बुद्धी सारखीच आहे तुझी!' राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका | Nilesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Nilesh Rane BJP leader comment on Ajit Pawar NCP

Nilesh Rane : 'तू सटकला लेका, उंची व बुद्धी सारखीच आहे तुझी!' राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका

Nilesh Rane BJP leader comment on Ajit Pawar NCP : राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप ही जरी नित्याची बाब असली तरी काहीवेळा राजकारणी एकमेकांवर करत असलेल्या आरोपांनी वातावरण गंभीर होते. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं समोर येत आहे. त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही आहे. यासगळ्यात एका नेत्याच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माजी खासदार निलेश राणे यांचे ते व्टिट व्हायरल झाले आणि राष्ट्रवादीकडून त्याची गांभीर्यानं दखल घेतली गेली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना लि. मुंबई या संस्थेच्या तज्ञ संचालक पदी अजित पवार यांची निवड झाली असे सांगत पुढे त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राणे यांनी म्हटले आहे की, अजित पवार आणि तज्ञ?? ऐकायला पण बरं वाटत नाही. त्यानंतर राणेंना राष्ट्रवादीकडून जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.

Also Read - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राणे यांना दिलेलं उत्तर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मिटकरी यांनी राणे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, तू सटकला लेका... उंची व बुद्धी सारखीच आहे तुझी. तुझ्या ## खालच्या कमेंट वाचल्या की तुझी लायकी पण कळते. हॅशटॅग टिल्लू... अशा शब्दांत मिटकरींनी राणे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवस राणे कुटुंबीय वेगवेगळया कारणांमुळे राजकीय चर्चेत आहेत. ते करत असलेली वक्तव्यं आणि त्यांना दिले जाणारे प्रत्युत्तर यासगळ्यात नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यापूर्वी देखील राणे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली होती.