ग्रामीण रस्त्यांसाठी नऊ हजार कोटी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई  - राज्यातील गाव-खेड्यांना जोडणाऱ्या १६ हजार २२९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी नऊ हजार ७७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मुंबई  - राज्यातील गाव-खेड्यांना जोडणाऱ्या १६ हजार २२९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी नऊ हजार ७७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

गाव-खेड्यांना दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ही मंजुरी देण्यात आली. या योजनेतून सात हजार ६०० कि.मी. लांबीच्या कामापैकी आतापर्यंत साधारण पाच हजार ८०४ कि.मी. लांबीची कामे पूर्ण झाली असून, एक हजार ७९४ कि.मी. लांबीची कामे प्रगतिपथावर आहेत. योजनेसाठी आतापर्यंत सहा हजार ६८६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे; तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परीक्षण केले असता ९६.३३ टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित २.६७ टक्के रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

Web Title: Nine thousand crore for rural roads