
राज्यात दिवसभरात नव्या 91 ओमिक्रॉन बाधितांची भर; 1682 रुग्णांना दिलासा
मुंबई : राज्यात ओमिक्रॉन बाधितांची (omicron new patients) संख्या पुन्हा एकदा वाढली असून आज 91 ओमिक्रॉन बाधित (Maharashtra omicron update) रुग्णांची नोंद झाली. नागपूर 18,औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबई मनपा प्रत्येकी 11, मुंबई आणि ठाणे मनपा प्रत्येकी 8, सिंधुदुर्ग आणि सातारा- प्रत्येकी 5, अमरावती, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे मनपा प्रत्येकी 4, यवतमाळ आणि पुणे ग्रामीण- प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा: दिल्ली-जेएनपीटी हायवे झाल्यास ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका - नितीन गडकरी
आजपर्यंत राज्यात एकूण 3,221 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी 1682 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 6,716 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 90 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
Web Title: Ninety One New Omicron Patients Found In Maharashtra Today Omicron Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..