"xxx माणसाची..."; मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली!

शिवसेना- राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Nitesh Rane,Uddhav Thackeray
Nitesh Rane,Uddhav ThackerayEsakal

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते नितेश राणे हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून केलेल्या म्याऊ-म्याऊ नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. मिरजमधल्या एका सभेत बोलताना राणेंची जीभ घसरली आहे. (BJP Leader Nitesh Rane abusing words about CM Uddhav Thackeray)

नारायण राणेंच्या (BJP Union Minister Narayan Rane) जुहूमधल्या बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठलाही नियम नसताना कारवाई करतात. आताच घरी एक नोटीस दिलीये. काही लोक क्षणात निर्णय घेतात. पण शिवसेना- राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राला पनवती लागून आज अडीच वर्षे झालीयेत. *** मुख्यमंत्री राज्याला मिळालेला आहे. *** माणसाची अडीच वर्षे झाली. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना फसवलं. कुठलंही विकासकाम महाराष्ट्रात होत नाही. फक्त लोकांना लुटण्याचा एककलमी कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com