"खोट्या केसमध्ये निलेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न"

आता नितेश राणे सोबत निलेश राणे ही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.
Nilesh Rane Case News Updates
Nilesh Rane Case News Updatesटिम ई सकाळ

बुधवारी कणकवली न्यायालयात शरण आल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे (Nitesh Rane) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याचवेळी त्यांचे धाकटे बंधू निलेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. आता नितेश राणे सोबत निलेश राणे (Nilesh Rane) ही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर निलेश राणेंविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचं नितेश राणेंच्या वकीलांनी म्हटलय. (Nilesh Rane Case News Updates)

नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “नितेश राणे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती पोलीसांनीचं निर्माण केली आणि चुकीच्या पद्धतीने रस्ता अडवला. कुठेतरी त्यांचा संयम सुटून त्यांनी वाईट कृत्य करावं, अशापद्धतीने पोलीस त्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत होते. एकंदरित ही पोलिसांची स्ट्रॅटर्जी असल्याचं लक्षात आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. खोट्या केसमध्ये निलेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला.”

Nilesh Rane Case News Updates
पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या बसने घेतला अचानक पेट, बस जळून खाक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवल्याचा (कलम १८८) आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी (कलम १८६) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com