नितेश राणेंबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर - विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मतदान करण्यावरून काही खळबळजनक विधाने केली होती. याबाबतचा अहवाल काँग्रेसचे विधान परिषद पोटनिवडणूक मतदान प्रतिनिधी शरद रणपिसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. तो अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाईल. त्यावर तेच निर्णय घेतील, असे वक्तव्य काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केले. येथील सुयोग या पत्रकार निवासस्थानी चहापानावेळी बोलत होते.

विखे पाटीले म्हणाले, की नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत नितेश राणे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमाकडे अशी विधाने केली होती, की त्याने पक्षशिस्त मोडली जाईल. याबाबत रणपिसे यांनी अहवाल तयार केला आहे. तो अहवाल प्रदेश पातळीवर पाठवला जाईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठीच त्यावर निर्णय घेतील. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान केल्यानंतर नितेश राणे माध्यमाकडे बोलले होते, की मी कोणाला मतदान केले आहे, हे सांगण्याची गरज नाही.

Web Title: Nitesh rane Marathi News Nagpur News Assembly Winter Session congress