
Ajit Pawar Video : राणेंना बाईनं पाडलं म्हणणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर; "या वेळी पार्थला…"
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा नारायण राणे यांच्यावर टीकी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हाच व्हिडीओ नुकतेच खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे तुफान फटकेबाजी करताना दिसत आहेत.
यामध्ये त्यांनी भाजपचे नेते नारायण राणेंनी शिवसेना फोडली त्यानंतर ते दोनदा निवडणूकीत पराभूत झाले, एकदा तर एका महिलेन त्यांना पाडलं अशी टीका अजित पवार करत आहेत दरम्यान या व्हिडीओवर आता नारायण राणेंचे पुत्र भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी माझा मित्र पार्थला निवडूण आणा असा टोला देखील राणेंनी लावला आहे. "अजित दादा मोठे नेते.. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे..राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.. शाम सावंत सोडून.. माहिती असुदे दादा.. बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा..".
"गेल्या वेळी बिचारा.. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला.. म्हणून ते काही होत का बघा.. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले.. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात.. तुमचा आवडता टिललु" असे नितेश राणे म्हणाले.
राऊत काय म्हणाले...
आपल्या ट्वीटमध्ये व्हिडीओसोबत संजय राऊत म्हणतात की, "दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र!"
व्हिडीओत पवार काय म्हणालेत?
या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात, "नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली तर सगळे पडले की नाही. नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा इथं कोकणात आणि एकदा मुंबईत बांद्रा का कुठे तरी उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं...बाईनं पाडलं बाईनं...अं ही त्यांची, प्रत्येकाची काय परिस्थिती आहे... "