गृहमंत्र्यांनी कारवाईची भाषा करण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी : नितेश राणेंचा इशारा ; Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

स्वतःची ताकद दाखवण्यासाठी, हिंदूंना दाबण्यासाठी हा मोर्चा काढला आहे.

'गृहमंत्र्यांनी कारवाईची भाषा करण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी'

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राणे म्हणाले, रझा अकादमीने जाणीवपूर्वक या दंगली घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याची माहिती माझ्याकडे आहे. लोकांना भडकवण्यासाठी त्यांनी पाॅम्पलेट वाटले आहेत. भडकवणारी भाषणं केली आहेत. त्यानंतर मोर्चा निघाला आणि दगडफेक झाली आहे. हिंदूंना संपवण्याचे काम अकादमी करत आहे.

मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. पण यामध्ये कोणालाही गालबोट लागले नाही. पण काल एका वेगळ्या उद्दिष्टाने मोर्चा काढण्यात आला आहे. स्वतःची ताकद दाखवण्यासाठी हिंदूंना दाबण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. महाराष्ट्र सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी. नाहीतर येणाऱ्या दिवसात त्यांना कसं संपवायचं हे आम्ही बघू असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा: रझा अकादमीचा भाजप, संघावर हल्लाबोल; प्रमुख सईद नुरी म्हणाले....

यावेळी संजय राऊत यांच्यावर ही निलेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, येणाऱ्या दिवसात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची सिडी मी संजय राऊतांना देणार आहे. यावरून शिवसेनेची नेमकी भूमिका काय होती हे त्यांना समजेल. महाविकास आघाडीचे चौथे पिल्लू म्हणजे रझा अकादमी आहे. असेही नितेश राणे म्हणाले.

loading image
go to top