युती म्हणजे सत्तेसाठी नंगा नाच!: नितेश राणे

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की युतीमध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे पडली. राम मंदिर, शेतकरी, नाणार प्रकल्प, बेस्ट कामगार यामुळे नाही तर मग कश्यासाठी. मुख्यमंत्री आमचाच यासाठी ही ठिणगी पडली. याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच!

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्या युतीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असताना आता शिवसेना विरोधक असलेल्या आमदार नितेश राणे यांनी युती ही मुख्यमंत्री आमचाच या मुद्द्यावर झाली असून, याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच, असे म्हटले आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तेत एकत्र असूनही गेल्या साडेचार वर्षांपासून धुसफूस सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत मित्रपक्ष भाजपला विविध मुद्द्यांवरून लक्ष्य केले. तर, या दोन्ही पक्षांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले होते. पण, या दोन्ही पक्षांनी नुकतेच एकत्र येत युती होणार असल्याचे जाहीर केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांनी युतीवरून शिवसेनेवर वार केले आहेत.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की युतीमध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे पडली. राम मंदिर, शेतकरी, नाणार प्रकल्प, बेस्ट कामगार यामुळे नाही तर मग कश्यासाठी. मुख्यमंत्री आमचाच यासाठी ही ठिणगी पडली. याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच!

Web Title: Nitesh Rane slams Shivsena BJP alliance in Maharashtra