आम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या नादी लागू नका : नितेश राणे

Nitesh Rane
Nitesh Rane

मुंबई : स्वाभिमानचे सरचिटणीस आणि आमदार निलेश राणेंनी काल (ता.14) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्वाभिमान संघटनेचे नेते आणि निलेश राणेंचे बंधू नितेश राणेंनी आम्ही सगळे नीलेश राणेंच्या मागे असल्याचे म्हटले आहे.

नितेश राणेंनी असेही म्हटले आहे, की अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायचे नाही, असे म्हणून त्यांनी एकप्रकारे ते निलेश राणेंच्या खंबीरपणे मागे असल्याचे दाखवले आहे. 

दरम्यान, नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कुणीही ऐरागैरा खासदार आणि आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हालाही शिवसेनाप्रमुखांची परिस्थिती जाहीर सभेतच उघड करावी लागेल, असे सांगत नीलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. दिघेंना किती त्रास दिला, सोनू निगम प्रकरण उघड करू, असा इशाराही काल नीलेश राणेंनी दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com