"भाजपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून दोनच व्यक्तींना नमस्कार केला, त्यातले एक..." - Nitin Gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari : "भाजपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून दोनच व्यक्तींना नमस्कार केला, त्यातले एक..."

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही अठवणींना उजाळा दिला. आज नाशिक येथील सिन्नर तालुक्यात गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडले. यावेळी गडकरी यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थितीत होते.

नितीन गडकरी म्हणाले, गोपीनाथ मुंडे आणि माझा जवळचा सबंध होता. जेव्हा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष तेव्हा मी नागपूर भाजप युवा मोर्चाचा आध्यक्ष होतो. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वागताकरिता कार्यक्रमाचा संयोजक मी होतो. त्यामुळे राजकारणात ज्यांच्या नेतृत्वात मी काम केले. असे माझे नेते आणि मार्गदर्शक गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे. 

मी ज्यावेळी भाजपचा अध्यक्ष झालो. तेव्हा इंदौरमध्ये मोठा कार्यक्रम होता. त्या व्यासपिठावर सगळे नेते बसले होते.  मी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तिंना नमस्कार केला. त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते. दुसरे गोपीनाथ मुंडे होते. 

गोपीनाथ मुंडे मला म्हणाले, नितीन तु मला वाकून नमस्कार का करतो. तु आता अध्यक्ष झाला. मी तेव्हा त्यांना सांगितले. मी जरी अध्यक्ष झालो. तरी माझ्या राजकीय जिवणाची सुरूवात तुमच्या नेतृत्वाखाली केली. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी माझे नेते तुम्हीच आहात, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. मंत्रिमंडळात माझा समावेश झाला. त्यावेळी मी दुसऱ्या विस्तारात मंत्री झालो. ज्यावेळी मुंडे साहेबांनी मला बोलावले आणि विचारले. नितीन आपल्याकडे दोन खाते आहेत एक उर्जा आणि दुसरे बांधकाम तुला काय पाहिजे, मी म्हणालो जे खाते तुम्ही द्याल ते खाते मी घेतो. यावेळी त्यांनी मला बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिली.