गडकरीच जेव्हा रस्त्यांबाबत म्हणतात, 'I am very sorry'

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

या प्रवासासाठी किती वेळ लागल्याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, की पेणजवळील जेएसडब्लू स्टील प्लॅन्टपर्यंतचे म्हणजे 7 ते 8 किमी अंतर पार करण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ लागला. येथील रस्ते भयानक आहेत. दररोज या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांबद्दल मला सहानुभूती आहे. मंत्री म्हणून मी माफी मागतो. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती केली जाईल. 

मुंबई : रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांचा अनुभव जेव्हा मंत्रीच घेतात तेव्हा त्यांच्याकडे माफी मागण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही, याची प्रचिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत पाहायला मिळाली. मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्ड्यांतून प्रवास केल्यानंतर गडकरींनीच माफी मागावी लागली.

मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईहून पेणकडे कार्यक्रमासाठी जात असताना गडकरींनी खड्ड्यांचा अनुभव आला. या प्रवासानंतर गडकरी म्हणाले, ''आज मी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करून रस्ता किती खराब असू शकतो याचा अनुभव घेतला. याबद्दल मी स्वतः माफी मागतो. पण, यात माझी चूक नाही. याला आगोदरचे सरकार जबाबदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात या रस्त्याचे काम झाले होते. त्याचे परिणाम आता दिसत आहेत.''

या प्रवासासाठी किती वेळ लागल्याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, की पेणजवळील जेएसडब्लू स्टील प्लॅन्टपर्यंतचे म्हणजे 7 ते 8 किमी अंतर पार करण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ लागला. येथील रस्ते भयानक आहेत. दररोज या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांबद्दल मला सहानुभूती आहे. मंत्री म्हणून मी माफी मागतो. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती केली जाईल. 

पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वेळेत या रस्त्याची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे मार्च 2019 पर्यंत काम होईल. चार लेनचा सिमेंटचा हा रस्ता असेल, असे गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. 

Web Title: Nitin Gadkari says I am very sorry on pathetic condition of Mumbai-Goa Highway